एक महत्वाची घडामोड कर्नल सोफिया कुरेशी विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं भाजपचे मंत्री विजय शहा यांना चांगलच फटकारले. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शहांना खडे बोल सुनावलेत. तुम्ही का जबाबदार पदावरती आहात त्यामुळे जबाबदार पदावर असूनही तुम्ही अशी वक्तव्य कशी काय करू शकता असा सवालच नव्यानं नियुक्त झालेले गवई यांनी केलेला आहे.