26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा हा भारताच्या ताब्यात आलाय. गुरूवारी संध्याकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी राणाला अमेरिकेच्या मियामीवरून घेऊन येणारं विमान दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरलं. 26/11 च्या मुंबई अतिरेकी हल्ल्यात आपण 164 जणांचा जीव गमावला. आज सतरा वर्षानंतरही मुंबईकर आणि भारतीयाच्या मनात त्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या आहेत. आणि या अतिरेक्यांविरोधातली चीडही कायम आहे. त्यामुळे राणाला भारतात आणताच आता पुढे काय असा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडलाय. राणाची चौकशी कोण करणार? राणाला कोणत्या तुरूंगात ठेवणार? राणावर आरोप काय? आणि सर्वात महत्वाचा सवाल म्हणजे राणाला अजमल कसाबप्रमाणे फाशी होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा NDTV मराठीचा हा एक्सप्लेनर