26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची NIA कोठडी सुनावण्यात आलीय.काल त्याचं यशस्वी प्रत्यर्पण करण्यात आलं.त्यानंतर त्याला रात्री पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं.यावेळी एनआयएच्या वकिलांनी राणाची 20 दिवसाची कोठडी मागितली.राणाच्या कोठडीची कारणंही वकिलाने कोर्टासमोर मांडली. तसेच राणा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याने काही पुरावे आणि तथ्य मिळवण्यासाठी त्याची कोठडी हवी आहे, असा युक्तिवाद एनआयएच्या वकिलांनी केला.दरम्यान त्याची रवानगी आता एनआयए कोठडीत करण्यात आलीय. NIA आता चौकशी करणार आहे.तहव्वूर राणाचं प्रत्यर्पण केल्यानंतर त्याचा पहिला फोटो एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय.