ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. ठाणे गुन्हे शाखेने दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतलं... आरोपींच्या संपर्कात असणाऱ्या तिघांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.. त्याचबरोबर आरोपींनी हत्येच्या वेळी वापरलेल्या बाईकही ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. दरम्यान, अजूनही उर्वरित आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही.. तसेच सह आयुक्तांच्या म्हणण्यानुसार आज मीनाक्षी शिंदेंना देखील चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.. त्यामुळे मीनाक्षी शिंदे आज चौकशीसाठी हजर राहतात का हे पाहणं महत्वाचं असेल.