नाशिकहून आपल्या मागण्यांसाठी मुंबईत आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळत नसल्याचा आरोप केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थी परवानगीसाठी पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारत आहेत, मात्र त्यांचे अर्जही स्वीकारले जात नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असून त्यांच्या आंदोलनाच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यातील वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.