Global News| अमेरिका एकाकी पडलेली महासत्ता, जागतिक अर्थव्यवस्थेवर S. Jaishankar यांचं विधान

नवी दिल्लीत आज म्युनिक सुरक्षा परिषद पार पडली आहे. या परिषदेमध्ये बोलताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी विविध जागतिक मुद्यांवर भाष्य केलं. तसेच सध्या चीनचं वाढतं वर्चस्व आणि अमेरिकेची बदलती रणनीती, अमेरिका आणि चीन यांच्यातील स्पर्धा अशा मुद्यांवर मंत्री एस.जयशंकर यांनी भूमिका मांडलीय.. जयशंकर यांनी अमेरिकेचं वर्णन ‘स्वतःच्या इच्छेने एकाकी पडलेली महासत्ता’ असं केलं, तर अमेरिकेची बदललेली भूमिका आणि चीनचं वाढतं वर्चस्व, यामुळे जागतिक परिस्थितीचं स्वरूप बदलत असल्याचं मत जयशंकर यांनी व्यक्त केलं. जागतिक स्पर्धा आता केवळ अमेरिका आणि चीनपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर अनेक राष्ट्र आपला प्रभाव आणि संसाधने ज्या प्रकारे वापरत आहेत, त्या पद्धतीत या स्पर्धेमुळे बदल झाला आहे”, असं सांगत एस.जयशंकर यांनी जागतिक स्थरावरील बदलत्या समीकरणांवर भाष्य केलं आहे.

संबंधित व्हिडीओ