Wardha तील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, लोअर वर्धा धरणातून कालव्याचे पाणी सोडले

वर्धा जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती आणि पावसाच्या खंडामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोअर वर्धा धरणातून खरीप पिकांसाठी नियोजित वेळेपेक्षा महिनाभर आधी कालव्याचे पाणी सोडण्यात आले आहे. याचा फायदा आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. पावसाअभावी आणि वाढत्या तापमानामुळे करपू लागलेल्या पिकांना या पाण्यामुळे जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

संबंधित व्हिडीओ