नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला आदिवासी विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा आज भिवंडीत दाखल झाला आहे. गेल्या सात दिवसांपासून पायी सुरू असलेला हा मोर्चा उद्या मुंबईतील राजभवनावर धडकणार आहे. आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्यासह सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची भरपाई आणि सेंट्रल किचन योजना बंद करून आश्रमशाळांमध्येच जेवण बनवण्याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.