धुळे जिल्ह्यातील लळींग घाट परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण तिहेरी अपघात घडला.या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल 26 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला रेतीने भरलेला डंपर आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली.अपघातानंतर टोल कर्मचारी व पेट्रोलिंग पथक घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढण्याचे काम करत होते.दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने अपघातग्रस्त ट्रक आणि डंपरला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत ट्रॅव्हल्सच्या केबिनमध्ये बसलेल्या काही जणांचा जागीच मृत्यू झाला.