पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिसंवेदनशील अशा वायसीएम रुग्णालयातील शवविच्छेदन विभागामध्येच पार्टी झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय.याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली...या प्रकरणी आता संबंधित डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्याला नोटीस बजावली असून तात्काळ खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत. वाय सी एम रुग्णालयात मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी गेलेल्या एका नागरिकाला रात्रभर ताटकळत ठेवावे लागल्यामुळे आणि नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी आत डोकावले असता या पार्टीचा पर्दाफाश झालाय.. या व्हिडीओमध्ये दिसणारी एक व्यक्ती वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेत.