मान्सूनची प्रतीक्षा आता संपली आणि याचं कारण मान्सूनचा भारताच्या दिशेनं प्रवास सुरू झालेला आहे. सध्या मान्सूननं निकोबार बेटावर वर्दी दिली असून उद्यापर्यंत अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. दरम्यान पाच दिवस आधीच मान्सून निकोबारमध्ये दाखल झाल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि त्याचा पुढचा प्रवास सुद्धा पाच दिवस आधीच सरकेल असा अंदाज सतरा वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच नियोजित तारखेच्या आधी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. सत्तावीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान पावसाबाबत पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ SD सानप यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी.