बीकेसी मध्ये आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला सायकल ट्रॅक काढला जाणार आहे. नागरिकाचा वापर करत नसल्यामुळे हा ट्रॅक काढला जाईल. विशेष म्हणजे संभाजीनगरमध्ये देखील कोट्यवधी रुपये खर्चून सायकल ट्रॅक बनवण्यात आला होता. त्याचं उद्घाटन तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. मात्र आता रस्त्यावरती हे ट्रॅक कुठेही दिसत नाहीयेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये अक्षरशः पाण्यात गेलेत.