राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. नंदुरबारमध्ये हातातोंडाशी आलेली रब्बी पिकं ही मातीमोल झाली आहेत. तर दुसरीकडे जळगावात सुद्धा शेतात पाणी शिरल्यानं पिकांना मोठा फटका बसलाय. अवकाळी पावसामुळे द्राक्ष नगरीतील द्राक्ष सुद्धा धोक्यात आली आहेत. नाशिकच्या मातोरी गावातल्या विशाल पिंगळे यांनी आठ एकर वर द्राक्ष घेतली आहेत. मात्र या पावसामुळे ही द्राक्ष बागच उध्वस्त झाली आहे. याशिवाय नाशिक मधल्या कांद्याच सुद्धा नुकसान झालंय. सूर्य आणि वांद्री प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात उन्हाळी भात शेती केली जाते. मात्र अवकाळी पावसामुळे भात पिकासह आंबा, जांभूळ, चिकू तसंच इतर भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.