वोडाफोनचे शिवसेना ठाकरे गटाला पत्र.एअरटेल नंतर आता वोडाफोन आयडिया कंपनी ही दूरध्वनी ग्राहक सेवा मराठीत सुरू करणार त्यासाठी गॅलरी व ग्राहक सेवेत मराठी मुला मुलींची नियुक्ती करणार.वोडाफोनकडून शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक तसेच शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांना पत्र लिहून ग्वाही.काही दिवसांपासून मोबाईल गॅलरीमध्ये मराठी बोलण्यावरून कर्मचाऱ्यांनी नकार दिला होता त्यावरून वाद झाला होता. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता एअरटेल नंतर वोडाफोन आयडिया कंपनीकडून ही मराठीत सेवा सुरू करण्याचे आश्वासन.