Chandrapur च्या राजुरा विधानसभा मतदारसंघात खरंच बोगस मतदार नोंदणी झाली का? NDTV मराठीची विशेष चर्चा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात सहा हजार मते वगळल्याचा आरोप केलाय.त्यानंतर राजुरा मतदारसंघ चर्चेत आलाय.विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सुभाष धोटे यांना उमेदवारी दिली होती. मात्र जवळपास तीन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. भाजपचे देवराव भोंगळे हे 2024 च्या निवडणुकीत विजयी झाले. निकालानंतर पराभवाचे विश्लेषण करताना धोटे यांना अनेक गंभीर बाबींकडे लक्ष वेधलं होतं. लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात अचानक 18 हजार मतं वाढली. एवढी मतं कशी वाढली, याबाबतचा संशय आल्याने धोटे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत सुमारे सहा हजार मतं आयोगाने वगळली. मात्र उरलेल्या अकरा हजार मतदार नोंदीतही बोगस मतदार असल्याचा आरोप धोटे यांचा आहे. तर मतदार वाढ ही नैसर्गिक आहे. प्रत्येक निवडणुकीत अशी वाढ होताच असते, असं म्हणत देवराव भोंगळे यांनी आरोप फेटाळलेत.

संबंधित व्हिडीओ