वाशिमच्या चांभईच्या मुरमाड जमिनीत शेतकऱ्यानं काश्मिरी ऍपल बोराची बाग फुलवली.मनरेगा अंतर्गत शेतकरी आनंदा आडुळे यांनी हा अभिनव प्रयोग केलाय.2 एकर मुरमाड जमिनीत शेतकऱ्यानं ऍपल बोर प्रजातीची लागवड करून भरघोस उत्पन्न मिळवलंय.अत्यंत गोड आणि मधाळ असणाऱ्या बोरांचा आकार सफरचंदा प्रमाणे आहे.वाशिमसह मंगरूळपीर, कारंजा आणि शेलू बाजार इथे या काश्मिरी बोरांना मोठी मागणी आहे.