एखादा व्यक्ती शेतकरी आहे हे कसं ठरवणार, तर त्यासाठी सातबारा लागतो.. पण आता महाराष्ट्रात सातबारा उताऱ्यात नाव नसले तरी शेतात प्रत्यक्ष राबणाऱ्या महिलांना अधिकृत ओळख मिळणार आहे... त्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकरी महिलेकडे शेती नाही, सातबारा देखील नाही, तरीही तिला शेतकरी प्रमाणपत्राच्या आधारे पीक कर्ज मिळणार, पीक विम्याचा लाभ होणार आणि शेतीशी निगडित योजना देखील मिळणार आहे. नेमकी काय आहे ही योजना आणि तिचा लाभ कसा मिळणार आहे.. सोबतच या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे, सांगत आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख.
Portal for women farmers' certification launched; what is the process to avail the scheme's benefits? NDTV explains in detail.