भारत हा तरुणांचा देश आहे, असे म्हटले जाते. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे नागरिकांचे आयुर्मान वाढले आहे. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सव्वा नऊ कोटी मतदार आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमावर निवडणूक आयोगाने मतदारांची माहिती जाहीर केली आहे. जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. तर नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांचे वर्चस्व अधिक आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार 92,491,806 नोंदणीकृत मतदार आहेत. महाराष्ट्रात 8 एप्रिल 2024 पर्यंत 48,081,638 पुरुष 44,404,551 महिला आणि 5,617 तृतीयपंथांता समावेश आहे.
बारामती कोल्हापूरसह 11 मतदार संघात आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
पुण्यात जिल्ह्यात सर्वाधिक मतदार
पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार आहेत. पुणे जिल्हा सर्वाधिक 8,282,363 मतदारांसह आघाडीवर आहे. मुंबई उपनगर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईत सर्वाधिक 7,356,596 मतदार आहेत. 6,579,588 मतदारांसह ठाणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यात 4,808,499, नागपूर जिल्ह्यात 4,272,366, शिरूरमध्ये 2,527,241 बारामतीमध्ये 2,326,487 आणि मावळध्ये 1,355,914 एवढे मतदार आहेत.
महायुतीचं जागा वाटप अडलं? भाजपचा नवा प्रस्ताव, दादा-भाई काय करणार?
या जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांचे अधिक वर्चस्व
रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया आणि सिंधुदुर्गात या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.
जिल्हा | पुरुष | महिला | तृतीयपंथ | एकूण |
रत्नागिरी | 6,31,012 | 6,72,916 | 11 | 1,303,939 |
नंदुरबार | 6,37,609 | 6,39,320 | 12 | 12,76,941 |
गोंदिया | 5,41,272 | 5,51,264 | 10 | 10,92,546 |
सिंधुदुर्ग | 3,30,719 | 3,32,025 | 1 | 6,62,745 |
भन्नाट ऑफर! मतदान करा... बोटाची शाई दाखवा... मोफत केस कापा...
या पाच जिल्ह्यात 30 लाखांहून अधिक मतदार
अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये 30 लाखांहून अधिक मतदारांची नोंद आहे. अहमदनगरमध्ये 36,47,252 मतदार सोलापूरमध्ये 36,47,141 मतदार , जळगावमध्ये 35,22,289 मतदार , कोल्हापूरमध्ये 31,72,797 मतदार आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये 30,48,445 मतदार आहेत. बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या 10 जिल्ह्यांमध्ये 20 लाखांहून अधिक मतदारांची नोंद आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world