पाकिस्तानात आता हवामानाचा तडाखा पाहायला मिळत आहे.पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी प्रचंड नुकसान झालंय.पाकिस्तानातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पंजाब प्रांतात शनिवारी धुळीचे वादळ आणि मुसळधार पावसामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे.92 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानच्या विविध भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.