2008 साली रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून मनसेप्रमुख राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने आज निकाल दिला आहे. तब्बल 18 वर्षांनी सदर प्रकरणाचा न्यायालयाने निकाल जाहीर केला. या सुनावणीवेळी राज ठाकरे स्वत: उपस्थित होते. सरकारी पक्षाने गुन्हा सिध्द होईल आणि आरोपींचा सहभाग स्पष्ट होईल असे ठोस पुरावे मांडले नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. त्यामुळे पुराव्यानभावी राज ठाकरे यांना ठाणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. कथित चिथावणी दिल्याच्या आरोपातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.