Santosh Deshmukh प्रकरण | सुनावणीवेळी आरोपीने कॉलर उडवली, धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. मात्र, आरोपींनी कोर्टाच्या स्क्रीनसमोरच कॉलर उडवत आक्षेपार्ह हावभाव केल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. न्यायालय आणि कायद्याचा अवमान झाल्याची भावना व्यक्त करत धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, या हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 4 जून रोजी होणार आहे... त्यामुळे पुढील तारखेला नेमकं काय घडतं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

संबंधित व्हिडीओ