हिंगोलीत पेट्रोल-डिझेलची मोठी टंचाई आहे. पंपावर दिवसरात्र वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेऊनच पंपावर जावं लागतंय.. हिंगोलीजवळच्या शिवारात गेल्यावर वासंबा शिवारात एका शेतात ट्रॅक्टरनं नांगरणी सुरु होती.. पण डिझेल संपल्यानं ट्रॅक्टर शेतातच बंद पडलं होतं. नेमकं काय घडलंय? हे जाणून घेण्यासाठी आम्ही ट्रॅक्टर चालकाशीच संवाद साधला. तेव्हा त्याने जे सांगितलं ते शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारं होतं...