दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी म्हणजे गोदावरी.बीड जिल्ह्यात गोदावरी सुमारे 75 किलोमीटर लांबीच्या पट्ट्यातून वाहते. त्याच गोदावरीचं आजचं रुप पाहण्यासाठी आम्ही गेवराई परिसरात पोहोचलो. गेवराईवरुन गोदावरीच्या पात्राकडे जात असताना नागझरी परिसरात आम्हाला एका विहिरीचं काम सुरु असलेलं दिसलं. या विहिरीची काय स्थिती आहे पाहुयात यावरचा आमचे प्रतिनिधी हा खास रिपोर्ट