बुलढाणा जिल्ह्यात इंधन तुटवडा भासत असून लोणार तालुक्यात ही इंधन तुटवडा भासत आहे.. अशातच सकाळी शहरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी डिझेलसाठी जीवघेणी धावपळ केल्याचं पाहायला मिळालं.. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय... हे शेतकरी सकाळपासून पंपाच्या बाहेर रांगेत उभे होते.. मात्र जसं डिझेल वाटप सुरू झालं तशी त्यांची एकच झुंबड उडाली.