Ratnagiri| कोकणात पावसाअभावी भातशेतीची जमीन भेगाळली; पावसाअभावी शेतीत भेगा, पिकांची वाढ खुंटली

कोकण म्हटलं की मुसळधार पाऊस आणि डोलणारी भातशेती असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.मात्र यंदा चित्र पूर्णपणे उलटं आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे रत्नागिरीसह कोकणातील अनेक भागांमध्ये भातशेती संकटात सापडली आहे. शेतातील जमीन भेगाळली असून अनेक ठिकाणी पिकांना अंकुरही फुटलेला नाही. ज्या शेतातून दरवर्षी चार खंडी भात निघायचा, त्या शेतातून यंदा पाच किलो भातही मिळणार नसल्याची हतबल भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांची ही व्यथा जाणून घेतलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.

संबंधित व्हिडीओ