ठाण्यातील 21 वर्षीय युवकाचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील युवक कोरोनामुळं मृत्यू झालेला पहिला रुग्ण आहे. ठाण्याच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णलाय गेल्या काही दिवसांपासून त्या युवकावर उपचार सुरु होते. उपचारादारम्यान शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. तो युवक मुंब्रा येथील रहिवासी होता.मुंबईतही कोरोनाचे रुग्ण वाढले असून 23 मे रोजी 45 नवे कोरोना रूग्ण आढळून आले.त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आलाय.