Kolhapur| कोल्हापुरात अवतरला तब्बल 25 कोटींचा आमदार रेडा,जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा अशी ओळख

आजपर्यंत तुम्ही आम्ही हजार किंवा लाखांचा रेडा ऐकला आहे...मात्र कोल्हापुरात एक-दोन नव्हे तर 25 कोटींचा रेडा सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. भीमा कृषी प्रदर्शनात 'आमदार' नावाच्या रेड्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होतंय. 25 कोटी किंमत असलेला हा रेडा 4 वर्षांचा आहे. हरियाणातील पानिपतवरून थेट कोल्हापुरात आणलेला हा आमदार रेडा जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा आहे..या रेड्याचा महिन्याकाठी एक लाखांचा खर्च आहे..या रेड्याच्या मालकासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी पाहुया..

संबंधित व्हिडीओ