तीन वर्षानंतर युरोपच्या दारी शांतता नांदणार अशी चिन्हं दिसत असतानाच एक नवा वाद उफाळून आला. वादात सापडले ते फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ मॅक्रॉन, ब्रिटनचे स्टारमर आणि जर्मनीचे मर्स यांची एक भेट झाली. या भेटीचा व्हिडिओ समोर आला आणि त्यातल्या मॅक्रॉ यांच्या एका कृतीनं साऱ्या जगाचं लक्ष वेधलं त्यात मॅक्रॉ काहीतरी लपवत असल्याचं दिसतंय आणि त्यावरूनच संशयाचं वातावरण निर्माण झालं. नेमकं काय घडलं लपवलेली नेमकी गोष्ट कोणती होती मॅक्रॉन नेमकं काय लपवू पाहत होते त्यांच्यावर आरोप काय झालेत आणि फ्रेंच राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलंय. पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट