मुंबईच्या कुर्ला भागातील 500 घरांना मिठी नदीच्या पुराचा धोका निर्माण झालाय.पालिकेने नोटीस बजावूनही सुरक्षित स्थळी जाण्यास रहिवासी टाळाटाळ करत आहेत.सध्या या नदीतून 50 टक्केच गाळ काढण्यात आलाय.मिठी नदीचा अर्धा गाळ काढणे बाकी असल्याने पावसाळ्यात नदीचे पाणी नागरी वस्तीत शिरल्यास जबाबदार कोण,असा सवाल निर्माण झाला आहे.मिठीचे सौंदर्यीकरण, रुंदीकरण आवश्यक आहेच,मात्र त्याआधी बाधित रहिवाशांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन झाले पाहिजे अन्यथा रहिवासी बेघर होतील, असे शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी म्हटलंय.