नरिमन पॉईंट येथील ट्रायडेंट हॉटेलसमोर एक भलेमोठे बदामाचे झाड मुळासकट उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र घटना घडून अर्ध्या तासाहून अधिक कालावधी उलटूनही झाड बाजूला करण्यासाठी महानगरपालिका किंवा अग्निशमन दलाकडून कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. नरिमन पॉईंट हा पर्यटकांचा प्रमुख आकर्षणबिंदू असल्याने या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी...