PM Modi इंडोनेशियाच्या 6 ते 11 जुलैपर्यंत दौऱ्यावर, इंडोनेशियाच्या अध्यक्षांकडून मोदींचं स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये ते दाखल झालेत. जकार्ता विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांनी पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत केले. यावेळी इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री आणि इतर मंत्रीही उपस्थित होते. 06 ते 11 जुलैपर्यंत पंतप्रधान मोदी इंडोनेशियामध्ये असतील. या दौऱ्यात ते इंडोनेशियामधील काही महत्त्वाच्या स्थळांना भेट देतील. यामध्ये योग्याकार्ता येथील प्रांबानन मंदिराचा समावेश आहे. प्रांबानन मंदिर हे इंडोनेशियातलं भगवान शिवाचं मंदिर आहे.

संबंधित व्हिडीओ