Jammu and Kashmir मध्ये अमरनाथ यात्रेला सुरुवात; यात्रेकरूंचा दुसरा जत्था अमरनाथकडे रवाना

जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या उत्साहात अमरनाथ यात्रेला सुरुवात झालीय. यात्रेकरूंचा दुसरा जत्था आज अमरनाथच्या दिशेने रवाना झाला. यामध्ये साधू-संतांसह शेकडो भक्तांचा समावेश आहे.. बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात यात्रेकरू जम्मूत दाखल होत आहेत. 28 ऑगस्टपर्यंत अमरनाथ यात्रा सुरू राहणार आहे. आतापर्यंत तब्बल 4 लाखहून अधिक भाविकांनी यात्रेसाठी नोंदणी केलीय.. भाविकांच्या सुरक्षित यात्रेसाठी प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस, सीएपीएक, ट्रॅफिक पोलीस, आरोग्य विभाग, SDRF, आणि सुरक्षा विभाग यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत.. दरम्यान अमरनाथ यात्रेसाठी पोहोचलेल्या भाविकांची काय भावना आहे..पाहुयात..

संबंधित व्हिडीओ