श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने आज सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर केलाय. कथित देणगी चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी कृष्ण मोहन यांची सरचिटणीस म्हणून हंगामी नियुक्ती करण्यात आलीय. कृष्ण मोहन यांनीच राम मंदिरातील चोरीप्रकरणी FIR दाखल केली होती. दरम्यान कृष्ण मोहन यांनी देणगी स्वरुपात मिळालेल्या वस्तू गायब झाल्याच्या बातमीचं खंडन केलंय.. सर्व वस्तू सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिलीय..