मुंबईसह राज्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय. राज्यात पावसाचा जोर अजून वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलीय. पुढील 24 तासांसाठी अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, रत्नागिरी आणि कोल्हापूरसह घाटमाथ्याच्या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर कोकण आणि काही अन्य भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येतंय.