मुसळधार पावसामुळे विरार पूर्वेच्या पारोळ गावात मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय.. मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झालाय. अनेक दुकानांमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. परिसरातील सखल भाग अजूनही पाण्याखाली आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतेय. पारोळ - भिवंडी रोड वर सकाळी पाण्याचा अंदाज न आल्याने एक टेम्पो रस्त्यावर कलंडलाय.