आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली... त्यावेळी त्यांनी आढावा घेत यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत... हवामान खात्याच्या अंदाजानुसार नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तविली आहेत. यानुसार प्रशासनाने सतर्क राहून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.. त्यानुसार राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी इगतपूरी त्र्यंबकेश्वर भागाचा दौरा केला. तसेच ज्या भागामध्ये पाणी साचणार आहे तेथील पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपायोजनांचा आढावा घेतला आहे.