मुंबई आणि पुण्याकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अतिवृष्टीमुळे मुंबई-पुणे मार्गावरील वाहतुकीला मोठा फटका बसला असून नव्याने सुरू करण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरडीसोबत मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा मलबा रस्त्यावर आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले असून जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास मलबा आता हटवण्यात आले आहेत...