मुंबई आणि पुण्याकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.तब्बल 18 तासांनंतर मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय..अतिवृष्टीमुळे मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.. दरडीसोबत मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा मलबा रस्त्यावर आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करत मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आलं.. त्यानंतर आता दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.