Malegaon महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती; इस्लाम पार्टीचा काँग्रेस, शिवसेनेचा पाठिंबा लागणार

मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीची समाजवादी पक्षासोबत युती आहे.तर काँग्रेस,शिवसेनेचा पाठिंबा घेत इस्लाम पार्टी महापौर बसवणार आहेत.माजी आमदार आसिफ शेख यांची प्रथमच महापालिका निवडणुकीत लढलेल्या इस्लाम पक्षाचा मालेगावात महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा झाला..तरीदेखील इस्लाम पार्टीला काँग्रेस, किंवा शिवसेनेची मदत घेत आपला ' महापौर ' बसवावा लागणार आहे..या निवडणुकीत शिवसेनेच्या 18 तर काँग्रेसच्या 3 जागा निवडून आल्या आहेत.. एमआयएम पक्षाला 21 जागा तर भाजपाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे..मालेगाव महापालिकेत जरी त्रिशंकू परिस्थिती असली तरीही इस्लाम पार्टीचाच महापौर तेथे बसेल हे मात्र निश्चित झाले आहे.तर MIM हा महाराष्ट्रासाठी धोका आहे, अशी टीका इस्लाम पक्षाचे अध्यक्ष असिफ शेख यांनी केली... त्याचबरोबर मालेगाव महापालिकेत सत्तेसाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलंय.. एकनाथ शिंदेंना देखील आम्ही आवाहन केलंय.. त्यामुळे इतर पक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर आम्ही सत्ता स्थापन करू, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

संबंधित व्हिडीओ