ठाण्यात प्रसंगी भाजप विरोधी पक्षात बसणार', असं खळबळजनक वक्तव्य भाजपचे ठाण्यातले आमदार संजय केळकर यांनी केलंय. ठाणे महापालिकेवर आमचा अकुंश असेल, असं सांगतानाच सत्तेत असलो तरीही आमची भूमिका दोन्ही बाजूने असणार, असंही केळकर म्हणालेत. ठाण्यात भाजपचे 28 नगरसेवक निवडून आले असून सर्वात मोठा पक्ष म्हणून शिंदेंच्या शिवसेनेने 75 जागा मिळवत ठाण्यात मोठं यश मिळवलंय. ठाणे महापालिकेत बहुमतासाठीचा 67 हा आकडा गाठला असून ठाण्यात स्वबळावर सत्ता स्थापन करणं आणि शिवसेनेचा महापौर बसवणं सहज शक्य होणार आहे. त्यातच केळकरांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.