Abdul Sattar यांच्यासह निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस, विधानसभेवेळी मतदारांना धमकी दिल्याचा आरोप

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकी दिल्याचा गंभीर आरोप असलेले आमदार अब्दुल सत्तार आता कायदेशीर कचाट्यात सापडले आहेत. सिल्लोड न्यायालयाने याप्रकरणी आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह जिल्हाधिकारी आणि अन्य दोन निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे....सिल्लोड न्यायालयाचे न्यायमूर्ती के. टी. आढायके यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे..... भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ नुसार आमदार अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण आणि दादराव अहिरे यांना न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी वेळेवर कारवाई केली असती तर सत्तार निवडणुकीपूर्वीच अपात्र ठरले असते, असा दावा तक्रारदारांनी केला आहे.

संबंधित व्हिडीओ