'मुंबईत काँग्रेस आणि ठाकरे बंधू एकत्र असते तर चित्र वेगळं असतं', असं विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केलंय. बारामतीमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या जयंत पाटलांना मुंबई महापालिकेच्या निकालाबाबत विचारलं असता त्यांनी हे विधान केलंय.