मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता मुंबईचा महापौर नेमका कोण होणार याबाबतची उत्सुकता वाढलीय.. जानेवारी अखेरीस मुंबईसह सर्व महापालिकांमधल्या महापौरांची निवड होण्याची शक्यता आहे..पुढील आठवड्यात नगर विकास खात्यातर्फे महापौरपदाची सोडत काढली जाणार असल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिलीय...ही महापौर सोडत पार पडल्यानंतर दहा दिवसांनी महापौर निवड होणार असल्याचंही समजतंय.