'आपला महापौर झाला पाहिजे हे स्वप्न असेलच, आणि देवाच्या मनात असेल तर मुंबईत आपला महापौर बसेल', असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. आज मुंबई महापालिकेतल्या विजयी उमेदवारांशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. तसंच 'गद्दारी करणाऱ्यांना मराठी माणूस माफ करणार नाही, आपले 54 नगरसेवक फोडले तरीही आम्ही 65 जागा निवडून आणल्यात' असं वक्तव्यही उद्धव ठाकरेंनी केलंय. तर वरच्या देवानेच महायुतीचा महापौर करायचं ठरवलंय असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलंय.