केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाशिवरात्रीनिमित्त संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये रक्षा खडसे यांची मुलगी गेली होती. त्यावेळी काही टवाळखोरांनी तिची छेड काढली. ही छेड राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काढली असल्याची माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीच दिली. त्यानंतर हा आरोपी नक्की कोणत्या पक्षाचा याची चर्चा सुरू झाली.