विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या विजयाचं मोठं कारण ठरलेल्या लाडकी बहीण योजनेत आता अनेक मोठे निकष घालण्यात आले आहेत. ज्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. विरोधीपक्षाने यावरुन सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. शिवसेना नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकीनंतर भाजप सरकार लाडकी बहीण योजना बंद करेल असा मोठा दावा केला आहे.