पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. आरोपी आणि पीडित मुलगी यांची आधीपासून ओळख असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांकडून केला जात होता. परंतु हा दावा खोडून काढणारी माहिती पोलीस तपासातून सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. पीडितेला आपण बसमध्ये कंडक्टर असल्याचे खोटे सांगून आरोपी तिला घेऊन गेला. ती बसमध्ये जाताच त्याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजाही बंद केला. त्यानंतर पीडितेने बसमध्ये कोणीच नाही, मला खाली जायचे आहे, मला खाली जाऊ दे, अशी विनवणी केली. त्यानंतर आरोपीने पीडितेला बसच्या सीटवर ढकलून दिले. पीडितेने मदतीसाठी आवाजही दिले; मात्र आरोपीने तिचा गळा दाबला, आरोपीने आपल्याला जिवंत सोडावे यासाठी ती बचावाच्या प्रयत्नात होती