एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा वाद सुरू असतानाच शिंदे गटाच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली.शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के यांनी शरद पवारांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर दिल्लीत एक मोठा राजकीय कट शिजत असल्याची चर्चा सुरू झालीय.दरम्यान पवारांच्या भेटीनंतर उदय सामंतांनी भेटीचं कारण स्पष्ट केलं.राजकीय हेतूने भेट झाली नसून दिल्लीतील साहित्य संमेलनासंदर्भात चर्चा केली असल्याचं सामंतांनी सांगितलं.