यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानावर अनेक आरोप झाले.पण आता बोगस मतदान झालंय का असा आरोप होऊ लागलाय, तोही होतोय सध्या अनेक आरोपांमध्ये अडकलेल्या धनंजय मुंडेंवर, परळीत मतदानादिवशी मुंडेंचा कट्टर कार्यकर्ता कैलास फड याने विरोधी उमेदवार राजेसाहेब देशमुखांसोबत असलेल्या बॉडीगार्डला रोखलं, सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी तब्बल 82 दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय, आणि यावरूनच आता परळीत फेरमतदानाची मागणी होतेय. कोण आहे हा कैलास फड पाहुयात.