राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यापासून रुसवे फुगवे काही संपायचं नाव घेत नाहीत.कोणी पालकमंत्रीपदावरून नाराज आहे, कोणी मनासारखं खातं मिळालं नाही म्हणून नाराज आहे, कोणी मंत्रीपदानंतर इतर लाभाची पदं काढून घेतली म्हणून नाराज आहे, तर कोणी आपल्या पक्षातील नेत्यांवर आरोप होतात म्हणून नाराज आहे.पण ही झाली एकट्या दुकट्या नेत्यांची नाराजी पण सध्या एक मुद्दा असा आलाय की ज्यामुळे सगळेच मंत्री नाराज आहेत.पण नाराजीचा मुद्दा काय आहे आणि ही नाराजी सहज दुरू होण्यासारखी आहे का याबाबतचा हा रिपोर्ट पाहूया